महाळुंगे केंद्रस्तरीय यशवंतराव कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेचे उत्साहात आयोजन...!
![महाळुंगे केंद्रस्तरीय यशवंतराव कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेचे उत्साहात आयोजन...!](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_65702c32615e4.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : महाळुंगे केंद्रस्तरीय यशवंतराव कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेचे खराबवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघजाईनगर आयोजन करण्यात आले होते.
खेड तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाळुंगे केंद्रातील जिल्हा परिषदेच्या एकूण १८ शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. एकूण ५०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यातील एकूण १२ स्पर्धा प्रकारातून प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना बिट स्तरावर सादरीकरनासाठी निवड करण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा व जिल्हा परिषद शाळेचा उस्फुर्त प्रतिसाद बघता निकालयार्थीना नक्की कुणाचा नंबर काढायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील कला बघता हेच विद्यार्थी भविष्यात मोठे स्टेज, स्पर्धा गाजविल्या शिवाय राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया परीक्षक डावरे सर यांनी व्यक्त केली.
या स्पर्धेसाठी गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी श्रीरंग चिमटे, केंद्रप्रमुख रोहिदास रामाने, राजीव आंबेकर सर,जिल्हा परिषद शाळा वाघजाईनगर शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा पोखरकर, दत्तात्रय शेवकरी, गणेश दरवडे सर, ज्ञानेश्वर मोकाशी सर, प्रताप आडेकर सर, रमेश होडे सर, मुख्याध्यापिका आशा चव्हाण, खराबवाडी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण किर्ते तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश वर्पे, उपाध्यक्ष गोविंद शिळवणे तसेच सर्व व्यववस्थापन समिती सदस्य व सर्व शिक्षक वृंद वाघजाईनगर शाळा उपस्थित होते.