खराबवाडीत मतदार यादी पडताळणीसाठी विशेष कॅम्प; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन...
प्रतिनिधी :- विश्वनाथ केसवड चाकण,
खराबवाडी ग्रामपंचायत खराबवाडी यांच्या वतीने भारत निवडणूक आयोगाच्या SIR कार्यक्रमांतर्गत विशेष मतदार यादी पडताळणी कॅम्पाचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये सन 2002 च्या मतदार यादीचे सन 2024 च्या यादीशी मॅपिंग करण्यात येणार असून मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच 2002 च्या यादीत नाव नसलेल्या महिलांकडून माहेरच्या नातेवाईकांची माहिती घेऊन त्यांचे मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हा विशेष कॅम्प सोमवार दि. 25 मे 2026 आणि मंगळवार दि. 26 मे 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6.15 या वेळेत हनुमान मंदिर, खराबवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व मतदारांनी आपले मतदान ओळखपत्र व संबंधित आवश्यक माहितीसह उपस्थित राहून पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक ग्रामपंचायत खराबवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.