हुतात्मा राजगुरू शहीद दिनाला ‘शासकीय’ दर्जा देण्याची मागणी...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या शौर्याला आणि बलिदानाला योग्य सन्मान मिळावा, यासाठी आता महाराष्ट्रात मोठी मागणी जोर धरू लागली आहे. पंजाबच्या धर्तीवर राज्यातही ‘शासकीय शहीद दिन’ साजरा करण्यात यावा, अशी ठाम भूमिका पुणे जिल्हा परिषद गटनेते ॲड. विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील यांनी मांडली आहे.
या संदर्भात त्यांनी थेट राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेत निवेदन सादर करत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
काय आहे मुख्य मागणी?
▪️ राजगुरू शहीद दिनाला शासकीय दर्जा द्यावा
▪️ राज्यभर अधिकृत कार्यक्रम आयोजित करावेत
▪️ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रशासनाची उपस्थिती बंधनकारक करावी
▪️ कॅबिनेट बैठकीत विषय मांडून त्वरित निर्णय घ्यावा
शिंदे पाटील यांनी
राजगुरूनगर येथे बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले—
पंजाबमध्ये शहीद दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रातही तोच सन्मान मिळाला पाहिजे.
शिवजयंतीप्रमाणे राजगुरूंच्या शहीद दिनालाही शासकीय प्रोटोकॉल मिळायलाच हवा.
मंत्रालयासमोर राजगुरूंचे स्मारक असणे अभिमानाची बाब असली, तरी त्यांच्या जन्मभूमीत होणाऱ्या कार्यक्रमांना अधिकृत मान्यता नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या पुढाकारामुळे खेड तालुक्यातील नागरिक, संस्था आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजगुरूंच्या बलिदानाला ‘शासकीय सन्मान’ मिळणार का?
राजकीय पातळीवर हालचाली वेगात… निर्णयाची प्रतीक्षा!