पालखेड बंधारा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ...

पालखेड बंधारा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ...

NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे दि.५ डिसेंबर रोजी स. ९ वा जता 15 व्या वावित्त आयोग निधीच्या माध्यमांतून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

यामध्ये मुस्लिम गल्लीत भूमिगत गटार करणे, पाणीपुरवठा विहीर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे व पंप हाऊस दुरुस्ती करणे, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १००० लि.वॉटर फिल्टर बसवणे. आधी कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर याप्रसंगी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी कर्मचारी वृंद यांनी केले आहे.