ब्रेकिंग न्यूज | खेड तहसीलदार पुन्हा अडचणीत? कोट्यवधींच्या जमीन प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश...

ब्रेकिंग न्यूज | खेड तहसीलदार पुन्हा अडचणीत? कोट्यवधींच्या जमीन प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,

खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मौजे मोई येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन प्रकरणात त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३ महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

 नियमबाह्य आदेशाचा आरोप

मौजे मोई (गट क्र. ९५) येथील जमीन प्रकरण यापूर्वीच्या तहसीलदारांनी फेटाळले होते. मात्र, प्रशांत बेडसे यांनी जुन्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत १९ सप्टेंबर २०२५ रोजी नव्याने आदेश दिल्याचा आरोप आहे.

शासकीय कागदपत्रांमध्ये फेरबदल, तसेच अर्जदारांशी संगनमत करून कोट्यवधींच्या जमिनीबाबत बेकायदेशीर निर्णय घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

प्रशांत बेडसे यांचा कार्यकाळ यापूर्वीही वादात राहिला आहे. वकील संघटनेच्या तीव्र विरोधानंतर त्यांचे निलंबन झाले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.

या नव्या चौकशीमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तीन महिने या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.