नाणेकरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब (बाबूदादा) नाणेकर यांचे दुःखद निधन...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
नाणेकरवाडीचे माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच ट्रॅफिक मुक्त चाकण अभियानातील निस्वार्थी कार्यकर्ते कै. रावसाहेब (बाबूदादा) बाबासाहेब नाणेकर यांचे रविवार, दि. 31 मे 2026 रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या अकाली निधनामुळे नाणेकरवाडी परिसरासह सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्पर असणारे आणि साधेपणाने लोकांशी नाते जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
ट्रॅफिक मुक्त चाकण अभियानात त्यांनी केलेले योगदान विशेष उल्लेखनीय असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने समाजसेवेतील एक समर्पित कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.