चाकण ग्रामीण रुग्णालयात covid 19 च्या प्राथमिक शाम्पल टेस्टसाठी टिम सज्ज..

  पुणे : विश्वनाथ केसवड ( खेड प्रतींनिधी ) चाकण ग्रामीण रुग्णालयात covid 19 च्या प्राथमिक शाम्पल टेस्टसाठी टिम सज्ज.. चाकण ग्रामीण रुग्णालयात swab टेस्टसाठी ग्रामीण रुग्णालयातील जितेंद्र उनवणे व आसिफ शेख यांनी टिम ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.माधव कणकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाली आहे. या टेस्टच्या माध्यमातून ४ व्यक्तीचे शाम्पल आता पर्येंत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यातील एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह तर उर्वरित ३ व्यक्तीचे रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. डॉ.माधव कणकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पर्येंत ३०० रुग्णाची तत्त्वतः तपासणी पूर्ण केली आहे त्यात कोणत्याही प्रकारचे कोरोंना लक्षण आढळले नाहीत..तरी सर्व चाकण परिसरातील नागरिकांनी स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी..त्यातूनच आपण या आजारावर नक्कीच मात करू शकतो.. News15 मराठी