खराबवाडी वाघजाईनगर येथे हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा सण 2026 ची कार्यकारिणी जाहीर...

खराबवाडी वाघजाईनगर येथे हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा सण 2026 ची कार्यकारिणी जाहीर...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड

खराबवाडी वाघजाईनगर परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा सण 2026 च्या नवीन कार्यकारिणीची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. नागेश अशोक शेलार यांची तर उपाध्यक्षपदी श्री. विठ्ठल दत्तात्रय बिरदवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीमुळे परिसरातील भाविक, नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मान्यवर, ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा हा खराबवाडी वाघजाईनगर परिसरातील श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्य जपणारा मानला जातो. दरवर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात हा सोहळा साजरा केला जात असून विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, दिंडी आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. नागेश शेलार यांनी बोलताना सांगितले की, सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यंदाचा दिंडी सोहळा अधिक भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

तर उपाध्यक्ष श्री. विठ्ठल बिरदवडे यांनी देखील सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरत धार्मिक आणि सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

परिसरातील नागरिकांकडून नव्या कार्यकारिणीकडून यंदाचा दिंडी सोहळा अधिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.