इंदोरीत भीषण दुर्घटना — बास्केटबॉल रिंग कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड मावळ,
मावळ तालुक्यातील Tolani Maritime Institute (TMI) मध्ये एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळाच्या मैदानावर सराव करत असताना एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बास्केटबॉल मैदानावर सराव सुरू असताना अचानक लोखंडी बास्केटबॉल रिंगचा संपूर्ण स्ट्रक्चर विद्यार्थ्याच्या अंगावर कोसळला.
या अपघातात तो गंभीर जखमी झाला.
जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
*विद्यार्थ्यांचा संताप उसळला*
घटनेनंतर कॉलेज कॅम्पसमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत:
वेळेवर ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती
सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी
मैदानावरील उपकरणांची देखभाल करण्यात निष्काळजीपणा
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत
मैदानावरील उपकरणांची नियमित तपासणी होत होती का?
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाले का?
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून केली जात आहे.
एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला… जबाबदार कोण? इंदोरीतील ही घटना संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करत आहे.