पांडुरंग नगरचा राजा मित्र मंडळ — सामाजिक बांधिलकी जपणारे एकजुटीचे पाऊल!
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
राजगुरुनगर शहरातील पांडुरंग नगरचा राजा मित्र मंडळ आयोजित आदरणीय वसंत हंकरे सर यांच्या “भरकटलेली तरुणाई आणि न समजलेले आई-बाप” या अत्यंत ज्वलंत आणि समाजप्रबोधनपर विषयावरील व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या व्याख्यानासाठी राजगुरुनगर शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.
आजच्या काळातील तरुणाईसमोरील आव्हाने, बदलती जीवनशैली, पालक-अपत्यांमधील संवाद आणि संस्कारांचे महत्त्व यावर वसंत हंकरे सर यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यासोबतच समाजाप्रती आपली जबाबदारी जाणवून दिली.
या कार्यक्रमाचे सौजन्य विलास शेठ केदारी आणि मारुती शेठ कोरडे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष गणेश शेठ शिंदे, पियुष्य दादा होरे, निशांतदादा तांबे, रुपेश लोखंडे, सचिन लोखंडे, ओमकार आरगडे, ओमकार फुंदे, निशांत अरगडे नितीन तनपुरे राहुल सहाने तसेच पांडुरंग नगरचा राजा मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन व परिश्रम घेतले.
समाजप्रबोधन, युवा पिढीला योग्य दिशा आणि संस्कारांची जपणूक यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने राजगुरुनगर शहरात एक सकारात्मक संदेश दिला.
vishwanathkeswad