BREAKING NEWS | खेड पोलिसांचा गुन्हेगारांवर कडक ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १३ सराईत गुन्हेगार तडीपार; २ धोकादायक इसमांवर MPDA अंतर्गत कारवाई
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
खेड पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांवर खेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील तब्बल १३ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, दोन धोकादायक इसमांवर MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
खेड पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच खेड उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते.
त्यानुसारमनोहर माणिक हजार, निखिल नवनाथ गोंगावले, राकेश पांडुरंग हजार, गणेश दत्तात्रय गाडे, गौरव राम हजार, रोहन उर्फ जम्मू अशोक शिंदे, सोमनाथ कुंडलिक शिंदे, दीपक दत्तात्रय सावंत, सोमनाथ उर्फ बाळके दत्तात्रय सावंत, अनिल विश्वनाथ सावंत, महेश दत्तात्रय हांडे आणि नवनाथ नामदेव गि-हे या १२ जणांविरुद्ध पुणे जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
तर राजेंद्र उर्फ राजू गणपतराव कोंढे, रा. कोंढेवस्ती, राजगुरुनगर यास पुणे, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर तडीपार करण्यात आले आहे.
दोन धोकादायक इसमांवर MPDAचा बडगा!
यासोबतच प्रविण उर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ, रा. वाळद आणि संकेत सुनील होले, रा. राक्षेवाडी यांच्यावर MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, दोघांना एक वर्षासाठी अनुक्रमे नागपूर व अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
खेड पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देणाऱ्या, भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महेश गड, पोलीस उपनिरीक्षक पुनाजी जाधव, सहायक पोलीस फौजदार शंकर भवारी, पोलीस हवालदार अमोल चासकर, विजय शेळके, मुकुंद कुंडकर, भिमा लांडे तसेच पोलीस अंमलदार स्वप्नील लोहार, गोकुळ कोळी, रमेश दाते, सोमनाथ गव्हाणे आदींचा सहभाग होता.
vishwanathkeswad