चाकणमध्ये हिट अँड रनचा थरार.! बेजबाबदार चालक धडक देऊन फरार...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, चाकण
चाकणमधील भाम–वाकी रोडवर रात्री ९:४० च्या सुमारास भीषण हिट अँड रनची घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” अशीच परिस्थिती या अपघातात पाहायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून (Activa) जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून दोन तरुण जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये १९ वर्षीय शिवम साबळे आणि त्याचा मित्र निशांत काळे यांचा समावेश आहे. यापैकी निशांत काळे याच्या खांद्याला गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेतील आरोपी हनुमंत मोकले हा अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून, Chakan Police त्याचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, रात्रीच्या वेळी बेदरकार वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा निष्काळजी चालकांवर कठोर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.