मतपेट्या घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा; उमरखेड निवडणूक अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

मतपेट्या घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा; उमरखेड निवडणूक अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया दि. 26 एप्रिल रोजी पार पडली असून, यानंतर कर्मचारी मतपेट्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये आले असता; उमरखेड निवडणूक अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व चॉकलेट देऊन स्वागत केले.

दिवसभर थकून आलेले कर्मचारी यांना मायेची आशा मिळावी या उद्देशाने उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि तहसीलदार सुरडकर साहेब यांच्या उपस्थितीत मतपेट्या घेऊन येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकामध्ये कर्मचाऱ्यांनी काम केल्याबद्दल पहिल्यांदाच असा कार्यक्रम केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्याबद्दल आनंद व्यक्त केला.