रस्त्यावर मृत्यूचा सापळा? संबंधित प्रशासन झोपेत?
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, चाकण
मुटकेवाडी चौकात रस्त्याच्या मधोमध तब्बल ५ फूट आत घुसलेला वाकलेला लोखंडी बीम सध्या वाहनचालकांसाठी थेट जीवघेणा सापळा ठरत आहे. हा बीम इतका धोकादायक पद्धतीने वाकला आहे की, विशेषतः रात्रीच्या वेळी तो दिसणं जवळपास अशक्य — आणि अपघात होणं निश्चित!
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का?असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
धोक्याची ठळक कारणे
रस्त्याच्या मधोमध ५ फूट पुढे आलेला बीम
रात्री पूर्णपणे न दिसणारी स्थिती
कोणतीही चेतावणी फलक किंवा लाईटची व्यवस्था नाही
मोठ्या अपघाताची गंभीर शक्यता
प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन बीम दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा हा निष्काळजीपणा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो.