राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उडाला अचानक गोधळ.! विश्रामगृहाचे नुकसान...

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उडाला अचानक गोधळ.! विश्रामगृहाचे नुकसान...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून, रज ठाकरे सध्या हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

यावेळी येथील विश्रामगृहात राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक गोधळ उडल्याचे दिसून आले आहे. दरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराची स्टील ग्रीन तुटल्याने ठाकरेचे कार्यकर्ते कोसळले आणि कार्यकर्त्यामध्ये वाद झाला. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.! मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाचे नुकसान झाले असून, पोलिसांनी यानंतर कार्यकर्त्यांना बाहेर काढले आहे.