शिव छत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेत लाखोचा घोटाळा, तर माजी अध्यक्ष यांचे कारणाम्यावर कारणाने…!
![शिव छत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेत लाखोचा घोटाळा, तर माजी अध्यक्ष यांचे कारणाम्यावर कारणाने…!](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_63380623da9a3.jpg)
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : शिव छत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेत लाखोचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. यात अनेक स्वतःला व्हाईट कॉलर समजणारे मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक सामिल असल्याचे समोर आले आहे. लाखोच्या घरात शासनाकडून पगार घेऊनही हे व्हाईट कॉलर शिक्षक या संस्थेतून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.
या शिव छत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेतुन लिपिकांच्या नावाने पैसे काढणारे हे व्हाईट कॉलर शिक्षक काढलेले पैसे स्वतःच्या आयकर परताव्यात दाखवत नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे लिपिकांच्या नावाने पैसे ते परस्पर गिळणकृत करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसापूर्वी हेच प्रकरण मिटविण्यासाठी माजी अध्यक्ष व काही शिक्षक विनवण्या करत होते. पण तेच नंतर चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमातून चर्चा करत असल्यामुळे शेवटी या पतसंस्थेची पोलखोल सुरु झाली आहे.
शिव छत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेत लाखोचा घोटाळा करणारे हे व्हाईट कॉलर शिक्षक विद्यालयात येऊन मुलांना कसे भविष्य घडविण्याचे धडे देत असतील यावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. यांच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हे कधी काही नावीन्य प्रयोग राबवताना दिसत नाहीत पण, असे कारनामे करण्यासाठी यांना कसा वेळ भेटतो हाच एक तारांकित प्रश्न उपस्थित होतो. याच पतसंस्थेचा माजी अध्यक्ष याचे तर त्याच्या स्वतःच्या शाळेतही अनेक कलंकित कारनामे केल्याचे समोर आले आहे. हा माजी अध्यक्ष विद्यालयात क्लार्क म्हणून काम बघतो पण काही काळ या माजी अध्यक्ष याने सहशिक्षक म्हणूनही हजेरी पत्रकात सह्या केल्या असल्याचा कागदपत्री पुरावा News15 मराठीच्या हाती लागला आहे. एवढेच नाही तर या माजी अध्यक्षाला या पतसंस्थेत लिपिकाच्या नावाने काढलेल्या पैशाची चोरी अंगलट येणार असे समजताच या माजी अध्यक्ष याने तडका फडकी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मोकळा झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
शिव छत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेत खेड तालुक्यातील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक, लिपिक हे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदावर काम करत आहेत. यात अनेक कष्टातून पुढे आलेले शिक्षक आहेत त्यांच्या कष्टाच्या पैशाचा हे स्वतःला व्हाईट कॉलर समजणारे शिक्षक जर असे त्यांचे पैसे गिळणकृत करत असतील तर हे कितपत संयुक्तिक आहे, यावर न बोललेले बरे. पण हे पदाधिकारी स्वतःचा एवढे साव समजतात यांची काळे कारनामे ते ज्यांना मार्गदर्शन करतात त्या गरीब घरातील विद्यार्थ्यांच्या आड लपून झाकण्याचा प्रयत्न करत असतील तर खरचं नियती त्यांना एवढ्या सोप्या शिक्षेने सोडेल का? यावर आता जन माणसात चर्चा सुरु झाली आहे.
या सर्व घोटाळ्याची व्याप्ती अजूनही मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अफरातफर करणाऱ्या शिक्षकांची थेट तक्रार गुन्हे शाखा पुणे, शिक्षणाधिकारी पुणे, राज्य शिक्षण आयुक्त व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे. काही पदाधिकारी हे आमचा वशिला मोठ्या नेत्यांकडे आहे अशा अविर्भावात आहेत. पण, ज्यावेळी चुकीचे काही कराल त्यावेळी तुमच्या जवळचे नेतेही तुम्हाला रामराम घालत नसल्याचे उदाहरणं राज्यातील जनतेने अनेक वेळा पाहिले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात नक्की कोण कोणत्या व्हाईट कॉलर समजणाऱ्या मुख्याध्यापक, सहशिक्षक, लिपिक यांचा सहभाग आहे यांची लवकर नावे News15 मराठी समोर आणणार आहे. तो पर्यंत अजून किती चुकीचे पुरावे हाती लागतात हेच पहावे लागेल.