कळस बु जिल्हा परिषद केंद्र शाळेत शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप..
News15 विशेष प्रतिनिधी अकोले : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शाळा बंद कराव्या लागल्या. तरी पोषण आहारासाठी आलेला तांदुळ व डाळींचे पाटप करण्याचे आदेश शिक्षक विभागाच्यावतीने दिल्याने कळस बुद्रुक जिल्हा परिषद केंद्र शाळेत शालेय पोषण आहार योजनेतिल धान्य विद्यार्थी आणि पालकांना वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ दिघे, अध्यक्ष ईश्वर वाकचौरे, ज्ञानदेव निसाळ प्रकाश बिबवे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, संपत भोर, संजय शिंदे, नंदा कातोरे, गायत्री गोरे, चैताली लोंढे, भागवत कर्पे, अनाजी मुठे आदी उपस्थित होते. तिनशे दहा विद्यार्थ्यांना तांदूळ, मठ, हरभरा, मुगडाळ, तुरडाळ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होऊ नये,यासाठी प्रत्येक वर्गाला ठराविक वेळ देण्यात आली होती. रांगेत उभे रहाण्यासाठी रिंगण तयार करण्यात आले होते. पालकांना हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. ठराविक अंतर ठेउन रांगेत उभे राहून पालकांनी धान्य घेतले. शाळा समितीच्या वतीने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कशी करता येईल यासाठी शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.