चितळाच्या शिकार प्रकरणी ५ आरोपींना द्रव्यदंडासह १ वर्षाचं सश्रम कारावास...

चितळाच्या शिकार प्रकरणी ५ आरोपींना द्रव्यदंडासह १ वर्षाचं सश्रम कारावास...

NEWS15 प्रतिनिधी - साहिल रामटेके

लाखांदूर : मागील ५ वर्षांपूर्वी आरक्षित जंगलात प्रवेश करून, चितळाची शिकार करताना रंगेहात पकडण्यात आलेल्या ५ आरोपींना; दोषी ठरवून स्थानिक लाखांदूर न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये दंडासह प्रत्येकी १ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल स्थानिक लाखांदूर न्यायालयाचे न्यायाधीश पूजा कोकाटे यांनी सोमवार दि.१० जुलै रोजी दिला आहे.

या निकालानुसार स्थानिक लाखांदूर न्यायालयाने लाखांदूर तालुक्यातील चिचोली अंतरगाव येथील गोविंदा तुळशीराम मोहनकर (७०), विलास पतिराम वाघमारे (३०), मंसाराम मोतीराम वाघमारे (४०), दुर्योधन सुदान वाघमारे (५५) व सोमेश्वर परमानंद खरोले (३०) अशा ५ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे.