व्यापाऱ्यांवर मोकाट कुत्र्याने केला हल्ला.! हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी...
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
उदगीर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट निर्माण झाला असून, हि मोकाट कुत्रे अनेकांना चावा घेत आहेत. या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली.!
मात्र नगरपालिका प्रशासनाने या मागणिकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
शहरत सांयकाळी चंद्रकांत विजय वडजे हे व्यापाऱ्यारी; उदगीर येथील चौबारा परिसरात दुकानाच्या शटरला कुलूप लावत असताना; मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला असून, या हल्ल्यात व्यापाऱ्यांचे ओठ फाटलेत.! त्यांच्यावर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या घटनेमुळे उदगीर शहरात भीतीचे वातावरण पसरले झाले आहे.