सर्वांगीण शैक्षणिक विकास साधणार - खा.भगरे
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेती,शिक्षण व आरोग्य या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील अडचणी सोडवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचे धोरण ठरवणार असल्याचे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी दिंडोरी येथे केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने खासदार भगरे यांचा सत्कार तसेच तालुक्यातील गुणवंत शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कारांचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जुनी पेन्शन योजना,शिक्षकांच्या रिक्त संख्या शाळांच्या भौतिक सुविधा,शाळाबाह्य कामे यासह इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न केंद्र शासन,राज्य शासन पातळीवर सोडवण्यासाठी कटिबद्ध असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. दिंडोरी शिक्षक संघाचे उपक्रम आदर्शव्रत असुन कोविडकाळात राबवलेले उपक्रम,रक्तदान शिबिरे , शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा,शिक्षक मेळावे,कॅलेंडर प्रकाशन,मासिक शिक्षकमित्र आदी उपक्रमांचे खा. भगरे यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीण जाधव हे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सभापती सुनिता चारोस्कर,गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी,माजी नगराध्यक्ष मेघा धिंदळे, वसंतराव थेटे,अनिल देशमुख,राजेंद्र गांगुर्डे,विठ्ठल अपसुंदे,सुनिल पेनमहाले,पृथ्वीराज शिरसाट,निवृत्ती नाठे,प्रदीप पेखळे,प्रदीप शिंदे, रामदास शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार बाळासाहेब अस्वले अशोक निकम, संदीप गुंजाळ, अमोल जाधव,शांताराम पगार आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक गुणवत्ता वाढवावी असे आवाहन केले तसेच जि.प.सभापती सुनिता चारोस्कर यांनी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिंडोरी शिक्षकसंघ अध्यक्ष सचिन वडजे यांनी केले.यावेळी विस्तार अधिकारी किरण शिंदे,पुरस्कार्थी प्रमिला जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी खासदार भास्कर भगरे यांचा दिंडोरी शिक्षक संघाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. माजी उपसभापती वसंतराव थेटे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी,शिक्षक संघाचे राज्य सदस्य प्रदीप मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
नाशिक विभागात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत प्रथम आलेल्या जऊळके दिंडोरी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा सत्कार व्यासपीठावर करण्यात आला.तालुक्यातील यावर्षीची आदर्श उपक्रम शाळा म्हणून उच्च प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (वाघाड) तसेच प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (वनारवाडी) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विस्तार अधिकारीपदी स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्याबद्दल किरण शिंदे तसेच जि.प.चा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल मनीषा गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुढील दिंडोरी शिक्षकरत्न पुरस्कार विजेते शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. - गणेश बोरसे शाळा दिंडोरी, सागर वसंतराव जगताप शाळा -साद्राळे, मंगल सोमवंशी रासेगाव,भाऊसाहेब बिरारी पत्र्याचा पाडा ,विलास पेलमहाले वाघाडवस्ती,प्रमिला जाधव पिंपळनारे ,योगिता चव्हाण मोहाडी , अशोक बागुल बंधारपाडा,छाया शिंदे लखमापूर,निवृत्ती चारोस्कर राजापूर , पुनम बैरागी -सोनजांब ,रमाबाई मोरे शाळा - कृष्णगाव,जगन्नाथ रत्नाकर दळवी शाळा - मावडी, आप्पा भोये
शाळा -देवघर, हिरामण भोये
शाळा -मोखनळ,केरबा आयलवाड शाळा - देवळीचा पाडा
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल पेलमहाले यांनी केले.तर आभार धनंजय आहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय कार्यकारी अध्यक्ष प्रमोद शिरसाठ,नंदकुमार गांगुर्डे,तालुका नेते धनंजय वानले,सरचिटणीस योगेश बच्छाव,संपर्कप्रमुख कल्याण कुडके, कोषाध्यक्ष नियाज शेख,मधुकर आहेर,कार्याध्यक्ष किरण शिंदे,नरेंद्र अहिरे ,प्रकाश सोनवणे भाऊसाहेब आहेर,शंकर ठाकरे,महिला आघाडी अध्यक्ष अमित सोनवणे उपाध्यक्ष बबीता पाटील,प्रवीण वराडे ,किशोर गायकवाड,नौशाद मुसलमान,गणेश बोरसे,चेतन घरटे आदींनी परिश्रम घेतले.