पुणे - कोथरूडमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्याच्या माणसाला.! गजा मारणे टोळीतील गुंडाकडून मारहाण...

पुणे - कोथरूडमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्याच्या माणसाला.! गजा मारणे टोळीतील गुंडाकडून मारहाण...

पुण्यातील गिन्हेगारी दिवसेंदिवस वर डोके काढत असून, येथील गावगुंड आणि टोळ्यांना कायद्याचा धाकच उरला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पुण्याच्या कोथरूड भागात ऐन शिवजयंतीच्या दिवशी गजा मारणे टोळीतील गुंडांनी केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय असलेल्या देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

तर बाईकला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि गुंडांनी जोग यांना गंभीर जखमी केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यामध्ये बाबू पवार, अमोल तापकीर, ओम तीर्थराम, किरण पडवळ या चौघांचा समावेश असून, बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणे याचा भाचा असल्याचे सांगितले जात आहे.

शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मिरवणूक सुरू असताना, चार जण दुचाकीवर जात असलेल्या देवेंद्र जोग यांना कट मारला. रागाने पाहिल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला, आणि चारही जणांनी मिळून जोग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नाकावर जोरदार ठोसा मारण्यात आला, त्यानंतर रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे देवेंद्र जोग यांची प्रकृतीची विचारपूस केली. जोग हे मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयात सोशल मीडिया कॅम्पेनिंगचे काम करतात. कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, गुंड गजानन मारणेचा भाचा बाबू पवार फरार आहे. या हल्ल्याच्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.