धक्कादायक.! निर्दयी प्रेयसी'ने आपल्या मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून केला प्रियकरास जीवे मारण्याचा प्रयत्न...

धक्कादायक.! निर्दयी प्रेयसी'ने आपल्या मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून केला प्रियकरास जीवे मारण्याचा प्रयत्न...

प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, PCMC

पुणे जिल्हा आणि औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहर हे मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे माहेर घर झाल्याचे जाणवत आहे. जिल्ह्यात विशेषत: पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून महिला अत्याचार, हत्या, दरोडा, अपघात करणे असे आणि इतर गंभीर गुन्हे या शहरात आणि परिसरात घडत आहेत. त्यामुळं गुन्हेगारीचे माहेर घर म्हणजे पुणे जिल्हा अशी ओळख निर्माण होण्याच्या मार्गावर हा जिल्हा दिसून येत आहे. तर इथे कायद्याच राज्य आहे का? आणि आरोपींना कायद्याचा धाक आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

अशी एक धक्कादायक आणि निर्दयी घटना पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातून समोर आली आहे. प्रेम संबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने एका निर्दयी प्रेयसीने तिच्या प्रियकराला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विशेष म्हणजे; हे सर्व घडत असताना.! या घटनेची दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होते. परंतु, वाचवण्यास कोणीही पुढे आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार; पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी वडाचा मळा परिसरात प्रेम संबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीने तिच्या प्रियकराला दगडाने ठेचून मारहाण केलीय. प्रियकर हा त्याच्या प्रेयसीला "तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडं ये असं म्हणत असल्यानं, वारंवार प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात भांडणे होत होती. अखेर या भांडणाला वैतागून आपल्या मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात तो प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांमध्ये निर्दयी प्रेयसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास विठ्ठल चव्हाण यांच्या विरोधात भा. न्या. सं .१०९, ११५ (२) , ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही चिखली पोलिसांनी अटक केली असून, पुढील कारवाई सुरू आहे.