स्काऊट गाईड व रोव्हर रेंजर तर्फे जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस साजरा...

स्काऊट गाईड व रोव्हर रेंजर तर्फे जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस साजरा...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी (यवतमाळ)

जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटणबोरी येथील स्काऊटस् गाईडस् व रोव्हर रेंजर तर्फे जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

सर्वप्रथम लाॅर्ड बेडन पाॅवेल व लेडी बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.गाईड कॅप्टन सौ.अनिता बळीराम कोरचे यांनी स्काऊट गाईड च्या जीवनात स्कार्फला किती महत्त्व आहे ते सांगितले.त्यांनी स्काऊट गाईड ला संबोधित करतांना सांगितले की स्कार्फ केवळ एक प्रतीक नाही तर आपल्या प्रतिज्ञेचे मजबूत प्रतीक आहे.म्हणून असे म्हणटले जाते की Once a Scout , Always a Scout.

जागतिक स्काऊट स्कार्फ दिनाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन प्राचार्य अनिल कासावार , जिल्हा समन्वयक गजानन गायकवाड तसेच पांढरकवडा तालुका स्काऊट प्रमुख  दिनेश घाटोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गाईड कॅप्टन कु.गीता मारोती कुमरे यांनी केले. कार्यक्रमाला  चंद्रकांत बुर्रेवार, अनिल गोरे, उदय उप्परवार, उस्मान खान,मनोज कांबळे, प्रशांत कुर्मावार,श्रीकांत कुडमेथे,विजय भेदोडकर,अंजली नालमवार,अभिजीत बोदिले, विनोद जंगमवार इत्यादी शिक्षक उपस्थित होते.