अल्पवयीन मुलीवर केला एका नराधमाने बलात्कार..
News15 प्रतिनिधी संजय ढवळे
घाटंजी : शहरातील ईस्तारीनगर मध्ये आकाश नरसिगं दर्शनवार वय २५ याचे शहरातीलच एका अल्पवयीन १७ वर्षीय मुली सोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करत असल्याची गंभीर घटना पुढे आली आहे. हि सदर घटना घरच्या मंडळीच्या लक्षात आल्यावर त्यांनी घाटंजी पोलीस स्टेशनला फीर्याद नोदविली. शहरात एकीकडे संचारबंदी लागू आहे तर दुसरीकडे संचारबंदीचा गैरवापर करून या तरुणाने असे घृणास्पद कृत्य केले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलीसांनी वेगाने करून आरोपीवर कलम ३७६/ ४६ नुसार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे