खराबवाडी येथील सोमवंशी परिवाराकडून ६५ कुटुंबाना किराणा मालाचे वाटप करून 4 बांधिलकीचे दर्शन..

News15 प्रतिनिधी विश्वनाथ केसवड चाकण : सध्या संपूर्ण राज्यात कोरोंना व्हायरसने मोठा अहाकार माजवला आहे. त्यातच चाकण औद्योगिक वसाहत परिसरात परप्रांतीय व काही राज्यातील इतर जिल्ह्यातून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खराबवाडी गावात कुटुंब वास्तव्यास आहेत. आज लॉकडाऊनचा ९ दिवस चालू असताना हातात रोजगार नाही. यामुळे गावातील हातावर पोट असणाऱ्या बऱ्याच कुटूंबाच्या दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत उरली नाही. खराबवाडी गावचे उद्योजक व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार अरुण सोमवंशी व त्यांच्या पत्नी खराबवाडी गावच्या माजी सरपंच योजनाताई सोमवंशी यांनी आज राम नवमीच्या दिवशी गावातील ६५ कुटूंबाला रोजचा लागणार किराणा माल भरून दिला व राज्यात चालू असलेल्या महाभयंकर कोरोंना व्हाइरसमुळे जी कुटुंब रस्त्यावर आली यांच्यासाठी एक 4 बांधिलकीचे दर्शन घडवून दिले. आज गावातील बरेच कुटूंब जेव्हा दिवसभर काम करतील तेव्हा ते रात्री आपल्या पोटाची खळगी भरतात. त्यातच कोरोंना या व्हायरसमुळे सर्व औद्योगिक वसाहत पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या कुटूंबाच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठीच आम्ही या गावातील नागरिक आणि आपण समाज्याचे काही तरी देणे लागतो या उद्देशाने ६५ कुटूंबाना रोजचा किराणा माल भरून दिला.. आज रामनवमी आहे आणि आजच्या दिवशी एक 4 बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला..यातून एक वेगळे असे आत्मिक समाधान मिळाल्याची भावना योजनाताई सोमवंशी यांनी बोलून दाखवली.. आज संपूर्ण महाराष्ट्रात असे 4 बांधिलकी जपणारे खूप कुटुंब आहेत जर असे कुटुंब एकत्र येऊन असा स्तुत्य उपक्रम राबवला तर नक्कीच माणसातील माणुसकी आणि समाज्याच्या विषयी असलेले प्रेम अभाधित राहिल्या शिवाय राहणार नाही.