खेड तालुक्यातील एका नामांकित विद्यालयात बोगस शिक्षक भरतीचा सुळसुळाट, संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, तर बोगस चोर शिक्षकांनी शासनाचा पैसा लाटला...!

खेड तालुक्यातील एका नामांकित विद्यालयात बोगस शिक्षक भरतीचा सुळसुळाट, संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, तर बोगस चोर शिक्षकांनी शासनाचा पैसा लाटला...!

News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

खेड (राजगुरूनगर): मागील काही दिवसापासून News15 मराठीने खेड तालुक्यातील एका शाळेच्या बोगस कारभाराचे वाभाडे ओढले होते. त्यानंतर शिक्षण विभागाला जाग येऊन त्या संस्थेची चौकशीही सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यातच आता खेड तालुक्यातील एका नामांकित संस्थेत तब्बल १० च्या वर शिक्षकांची बोगस भरती झाल्याचे निदर्शनात आले आहे. यात विशेष म्हणजे २ मे २०१२ नंतर राज्य शासनाने शिक्षक भरतील स्थगिती देऊनही या संस्थेत हात ओले करून शिक्षक भरती झाल्याचे निष्पन्न झाले आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती वरून शिक्षक भरतीला शासनाकडून स्थगिती असताना या शिक्षकांची भरती कोणत्या आधारावर केली? एवढेच नाही तर यातील काही शिक्षक यांच्या भरती प्रक्रियेची जाहिरात बोगस वर्तमान पत्रात दिल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. या शिक्षकांच्या पद मान्यतेसाठी जे ठराव देण्यात आले आहेत तेही बोगस असल्याचे दिसून येत आहेत. काही ठराव हे संस्थेचा वाद सुरु असताना देण्यात आले आहेत. ज्या संस्थेवर नक्की कोणत्या संचालक मंडळाचा अधिकार आहे हेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडून स्पष्ट होत नसेल तर या शिक्षकांना कोणत्या आधारे चुकीचे ठराव देण्यात आले यावर मोठे प्रश्न उपस्थित होतात.

एका बहाद्दर शिक्षकाबद्दल सांगायचे झाले तर, रोस्टरला एका वेगळ्या सहवर्गाची जागा रिक्त झाली होती. पण या बहाद्दर शिक्षकाला शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेण्यासाठी वेगळाच जातीय सहवर्ग दाखवल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर, या बहाद्दर शिक्षणाच्या बद्द्लही शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या कागदपत्रात तफावत दिसून येत आहे.

या नामांकित शिक्षण संस्थेत असाही प्रकार प्रकर्षाने दिसून आला आहे की, स्वतःची जात वेगळी आणि शासनाचे पैसे लाटण्यासाठी दुसरी जात दाखवल्याची धक्कादायक बाब दिसून आली आहे. या जातीच्या पडताळणी बद्दल उच्च न्यायलयानेही मोठी चपराक या जातीतील शिक्षकाला दिली आहे. तरी वरील कोर्टात अपील करून गप्प बोक्या सारखा डोळे झाकून शिक्षक शासनाचा लाखोचा पगार लाटत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एक ना अनेक काळे कारनामे व बोगस शिक्षक भरती प्रकरण राज्यभर गाजणार असल्याचे दिसून येते आहे.. संस्थेतील काही लालची लोकांना हाताशी धरून हे कारनामे केले असल्याचीही खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या बोगस भरतीमुळे विद्यालयाची मोठी वाताहत झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सध्या विद्यालयाची विद्यार्थी संख्या खूपच कमी झाली असून कमीत कमी ३ ते ४ शिक्षक यांच्यावर सरप्लस होण्याची वेळ आली आहे.

एवढेच नाही तर ज्या वेळी हे बोगस शिक्षक ज्या विषयासाठी भरती झाले तेव्हा संस्थेला या शिक्षकांची गरज नसताना कोणत्या आधारे यांना भरती करून घेतले हाही एक अनुत्तेरीत प्रश्न म्हणावा लागेल.

धक्कादायक म्हणजे संस्थेचे बिंदू नामावली जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून तपासून घेतली आहे की नाही? यावर उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत. त्यामुळे जी भरती झाली ती हात ओले करून झाल्याचे समोर आले आहे. यात एका शिक्षकेच्या प्रस्तावाला तब्बल ३२ त्रुटी काढुनही त्यावर तत्कालीन जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी कोणतेही कागदपत्रे न तपासता थेट या शिक्षकेची नियुक्ती केल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

यातील काही शिक्षक स्वतः राजकीय लोकांची हुजरेगिरी करून आमची इकडे ओळख, माझी याच्याशी ओळख अशा अजूनही अविर्भावात आहेत पण ते जर चुकीत सापडले तर, कोणताही नेता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

राजकीय लोकांच्या गळ्यापर्यंत आले की सपशेल ते त्या प्रकरणातून माघार घेऊन मोकळे होतात. या शिक्षकांची भरती तर बोगसच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यात विशेष बाब म्हणजे ज्यावेळी ही बोगस शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होती तेव्हा तत्कालीन मुख्याध्यापक म्हणून ज्या व्यक्तीची सही हवी असते त्याच व्यक्तीच्या सहीचे अधिकार न्यायालयाकडून गोठविण्यात आले होते. मग या शिक्षकांच्या ठरावावर व तस्सम  कागपत्रांवर तत्कालीन मुख्याध्यापक यांनी जी सह्या कोणाच्या अधिकारात केल्या. यात पूर्णपणे आर्थिक तडजोडी व दबाव तंत्राचा वापर झाल्याचेही दिसून येत आहे.

या नामांकित संस्थेच्या बोगस शिक्षण भरतीत अनेक ठरावं हे बिगर जावक क्रमांक व बिगर दिनांकाचे असल्याचे आढळून आले आहे. यातील सर्व बोगस शिक्षक मोठ्या प्रमाणात शिक्षक म्हणून लाखाच्या घरात बेकायदेशीर शासनाच्या पैशा लाटत असल्याचे निदर्शनात आले आहे. तरी या बोगस शिक्षकांवर कारवाई  करण्यासाठी शिक्षण विभाग तत्परता दाखवणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण होत आहे.

याच नामांकित संस्थेच्या बोगस भरती बद्दल संस्थेचे अध्यक्ष यांना विचारले असता, आमच्याकडून चुकून न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ बदलला असे बालिश पणाचे उत्तर आम्हाला देण्यात आले. जर सर्वच संस्थानी असे न्यायालयाच्या आदेशाचे सोईस्कर अर्थ काढले तर हे संस्था चालक कुणालाही शिक्षक म्हनून भरती केल्याशिवाय राहणार नाहीत.

या बोगस मधील काही शिक्षक असे आहेत की, त्यांना स्वतः इंग्रजी विषयात ३५ गुण नाहीत आणि त्यांना गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देवून त्यांचा गौरवही केला गेला आणि त्यांना शिकवणीसाठीही इंग्रजीच विषय दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून असे बोगस, लाचार शिक्षक, विद्यार्थ्यांचे कोणते भविष्य उज्ज्वल करणार हाही पालकांच्या समोरील यक्ष प्रश्नच म्हणावा लागेल.

या संस्थेतील असे अनेक काळे कारनामे लवकरच News15 मराठी जनतेसमोर आणणार आहे. या बोगस शिक्षक भरतीची ही एक बाजू आहे काही धक्कादायक खुलासे लवकरच News15 मराठीच्या माध्यमातून लवकरच समोर येतील.

निर्भीडता हिच आमची ओळख.. News15 मराठी..