खेड तालुक्यातील खंडोबा मंदिरात चेंगराचेंगरी..
News15 प्रतिनिधी विश्वनाथ केसवड पुणे : जिल्ह्यातील अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथील माघ पौर्णिमा निमित्ताने खंडोबा यात्रा उत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केल्याने आणि पुरेसे नियोजन नसल्याने देवस्थान स्थळी चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपुऱ्या नियोजनामुळे अनेक भाविकांचे दागिने व किंमती वस्तूवर चोरांनी डल्ला मारल्याच्या घटना आज यात्रेच्या ठिकाणी घडल्या.या अपुऱ्या नियोजनामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.