किर्गिस्थान येथे अडकले पुसद येथील ५ विद्यार्थी, पालक चिंतेत...

किर्गिस्थान येथे अडकले पुसद येथील ५ विद्यार्थी, पालक चिंतेत...

प्रतिनिधी किरण मुक्कावार, यवतमाळ

सध्या किर्गिस्थान येथे भारतीय आणि पाकिस्थान येथील विद्यार्थ्यांवर तेथील स्थानिक विद्यार्थी हल्ला करीत असल्याच्या घटना घडत आहेत. तर ह्या हल्ल्यात आत्तापर्यंत ४ पाकिस्थानी  विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आलीय. याच देशात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किर्गिस्थान येथे गेले असून, सुदैवाने पुसद चे हे विद्यार्थी अद्याप सुखरूप आहेत. पण किर्गिस्थान येथील गंभीर परिस्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. त्यांच्या पालकांनी विद्यार्थाना मायदेशी सुखरूप आणण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

भारतातील असंख्य विदयार्थी हे वैद्यकीय शिक्षणाकरिता आणि इतर अभ्यासक्रमाकरिता  परदेशी जातात . अशातच भारतातील जवळपास १४५०० विद्यार्थी हे शिक्षणासाठी  किर्गिस्थान येथे गेले आहेत . यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी हे किर्गिस्थानची राजधानी ब्रीस्टेक  येथे वैद्यकीय अभ्रासक्रमाकरिता गेले आहेत  . दरम्यान लोकल विदयार्थी आणि इजिप्तशिअन विद्यार्थ्यांमध्ये भांडणे झाली . यामुळे लोकल विद्यार्थ्यांनी इतर देशातील विद्यार्थाना सुद्धा आपला निशाणा बनविला आहे . यामुळे आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी यवतमाळचे पालक अतिशय चिंताग्रस्त आहेत

यवतमाळच्या या विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच आटपत आहे . आणि तिथली परिस्थिती बघता यवतमाळच्या पालकांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने वेळीच पावले उचलीत या विद्यार्थ्यांना विमानाची व्यवस्था करून मायदेशी परत आणण्याची कळकळीची विनंती केली आहे