उमरखेड शहरात 74 वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा...

उमरखेड शहरात  74 वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा...

NEWS15 प्रतिनिधी : किरण मुक्कावार

यवतमाळ : उमरखेड शहरातील विविध शासकीय इयमारतींवर तिरंगा फडकवून 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उमरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार अमोल माळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात प्रदिप पाडवी यांनी; नगरपरिषद मुख्याधिकारी जामनेर साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे झळके साहेब, माहिती कार्यालय उमरखेड येथे महल्ले साहेब यांनी तर तहसील कार्यालयात उपविभागीय महसूल अधिकारी व्यंकट राठोड यांच्या हस्ते; ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सर्व शाळा महाविद्यालयांवर तिरंगा फडकावून  प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरानी सहभाग घेतला.