रस्ता मजबुतीकरण आणि सुधारणा संदर्भात, आमदार बाबासाहेब पाटलांचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना निवेदन...
![रस्ता मजबुतीकरण आणि सुधारणा संदर्भात, आमदार बाबासाहेब पाटलांचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना निवेदन...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64e5a6557fd72.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
भारत माला परियोजनांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 चाकूर लोहा भाग किलोमीटर 114 ते 187 या रस्त्याचे चौपदरीकरण करणे तसेच अहमदपूर शिरूर ताजबंद आणि चाकूर शहरातील रस्त्याची मजबुतीकरणाची करून सुधारणा करावी या संदर्भात नितीन गडकरी केंद्रीय मंत्री सडक परिवहन व राजमार्ग यांना आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून देण्यात आलेल्या या निवेदनात भारत माला परियोजनांतर्गत चाकूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 या रस्त्याची सोपदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नांदेड यांच्या अधिनिस्त खाली कल्याण टोल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत चाकूर लोहा नांदेड प्रगतीपथावर असून वाहतूक व बाजारपेठेच्या अनुषंगाने सदर सिमेंट काँक्रेट रस्त्याचे चौपदरीकरण आवश्यक आहे, त्याचबरोबर अहमदपूर शिरूर ताजबंद आणि चाकूर शहरातून जाणारे रस्ते सिमेंट काँक्रेटचे होण्यासाठी अवश्यक तो निधी मिळावा असे नमूद केले आहे.
यासंदर्भात संबंधित कार्यालयास व संबंधित गुत्तेदारास योग्य ती कारवाई करावी असे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याने संबंधित कामास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असून या मागणीने जवळपास अहमदपूर (5 किलोमीटर), शिरूर ताजबंद (5 किलोमीटर) व चाकूर (5 किलोमीटर) अशा लांबीचे शहरातून जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होऊन कायमस्वरूपी शहरवासीयासाठी रस्त्याची सोय होणार आहे.या वेळी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या समेवत सिद्धी शुगर अँड अलाईड इंड लि व्हा प्रेसिडेंट पी जि होणराव आदी जन उपस्थित होते.