ग्रामीण शाळेचा आदर्श बदल — सायगावच्या मराठी शाळेत उत्साहवर्धक उपक्रमांची मेजवानी

ग्रामीण शाळेचा आदर्श बदल — सायगावच्या मराठी शाळेत उत्साहवर्धक उपक्रमांची मेजवानी

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, खेड

ग्रामीण भागातील अनेक मराठी शाळा बंद होण्याच्या वाटेवर असताना, सायगाव येथील मराठी शाळा मात्र नवचैतन्याने फुलत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेत मोठे बदल घडून येत आहेत.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे अलीकडेच गावातून विद्यार्थ्यांनी काढलेली प्रभात फेरी तसेच माऊलींच्या साडेसातशेव्या जयंतीनिमित्त काढलेली भव्य मिरवणूक. विशेष म्हणजे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केलेली इंग्रजी भाषणे आणि लहान मुलींचेही स्टेजवरचे धाडस सर्वांना थक्क करणारे ठरले.

गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त करत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे शाळा योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य नक्कीच उज्वल होईल.

या प्रगतीमागे शिक्षकांचा उत्साह, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा सुंदर संगम दिसून येतो. सायगावची ही शाळा आज इतर ग्रामीण शाळांसाठी आदर्श ठरत आहे.