अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा, छावा मराठा सेना संघटनेत प्रवेश...
![अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा, छावा मराठा सेना संघटनेत प्रवेश...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_6593c56722e8f.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - निफाड
निफाड तालुक्यातील अखिल भारतीय छावा संघटनेच्या निफाड तालुका कार्याध्यक्षांसह; शेकडो कार्यकर्त्यांनी छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रवेश केला आहे.
संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर यांच्या सुचनेनुसार संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख पोपट भाऊ पा. पताडे यांच्या मार्गदर्शनाखाली; छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य संघटनेत प्रवेश करण्यात आला आहे.
छावा मराठा सेना संघटना ही एक सामाजिक संघटना असून, या संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली ज्वलंत क्रांतिकारी संघटना असल्याचे प्रतिपादन संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख यांनी केले आहे. तर छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य संघटना ही शेतकरी, कामगार, सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारी व महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सदैव तत्पर असणारी संघटना आहे अशी सर्वसामन्यांमध्ये या संघटनेची ओळख आहे.
याप्रसंगी खालील पदाधीकाऱ्यांना निफाड तालुका कार्यकारिणीची जबाबदारी देण्यात आली आहे.
१) श्री. प्रमोद गणपत धुमाळ - निफाड तालुकाध्यक्ष
२) श्री. शुभम सुरेश सुरलकर - निफाड तालुका उपाध्यक्ष
३) श्री. संभाजी अण्णा लोणारे - निफाड तालुका कार्याध्यक्ष
४) श्री. दर्शन संजय वाघे - निफाड तालुका संघटक