विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर.!
![विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर.!](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63de0828e289c.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : राजेश देवडकर
चिंचवड : भाजप आमदार स्व. मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे, विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळं या जागी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी- चिंचवड भागातील चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला.
या दोन्ही आमदारांच्या निधनांमुळे रिक्त झालेल्या या जागी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भाजची इच्छा आहे. परंतु, ही याठिकाणी इतर राजकीय पक्षांनी दावा केल्यानं.! आता ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचं बोलल जात आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर; भाजप कुणाला उमेदवारी देणार आणि कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
अखेर विधानसभेच्या कसबा मतदारसंघ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी भाजप'ने उमेदवार जाहीर केले असून, यात.! विधानसभेच्या कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आणि पिंपरी-चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी पक्षनेतृत्वानं जाहीर केली आहे.