कॉग्रेस'नेते सतेज पाटील छत्रपती घराण्यातील उमेदवारावर चिडले.! दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं...

कॉग्रेस'नेते सतेज पाटील छत्रपती घराण्यातील उमेदवारावर चिडले.! दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं...

कोल्हापूर - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे पडघम वाजले असून, आज ४ नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी माघार घेण्याचा दिवस असल्याकारणाने अनेक बंडखोर आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

परंतु, कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडे उमेदवारच राहिला नाही. तर त्यानंतर मात्र कॉग्रेस नेते सतेज पाटील हे चांगलेच भडकले असून, सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील उमेदवारावर संतापले असल्याचे दिसून आले.

पाटील म्हणाले की, 'दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद' असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेश लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घ्यायला नकार दिल्यानंतर मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासाठी मात्र हा धक्का असल्याचं समजलं जातंय.