कळमनुरी विधानसभेसाठी महाविकास आघाडी'कडून डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी.! शिवसेना विरूद्ध शिवसेना लढत...

कळमनुरी विधानसभेसाठी महाविकास आघाडी'कडून डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी.! शिवसेना विरूद्ध शिवसेना लढत...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकासकडून, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत पाहवयास मिळणार आहे.

डॉ. संतोष टारफे यांची उमेदवारी जाहीर होताच; महाविकास आघाडीकडून फटाके फोडुन जल्लोष साजरा करण्यात आला.