३ हजार रुपयाच्या लाच प्रकरणी; तलाठी अडकला ACB च्या जाळ्यात...
![३ हजार रुपयाच्या लाच प्रकरणी; तलाठी अडकला ACB च्या जाळ्यात...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_65323eece159a.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, गोंदिया
शेतीचा फेरफार करण्यासाठी सडक-अर्जुनी तालुक्याच्या चिखली येथील तलाठी यांनी; शेतकरी तक्रारदार यांना 3 हजार रुपयाची लाच मागितल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तलाठी सुरेन मारगाये (वय ३८ वर्ष)त. सा. क्र : १७, चिखली असे आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार 19 ऑक्टोंबर रोजी पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली असून, आरोपी सुरेन मारगाये याने 3 हजार रुपयाची मागणी केली होती. तडजोडी अंती 2 हजार 500 रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले आहे. आरोपीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन – डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय.