महाळुंगे विकास सेवा सहकारी संस्थेने १००% वसुल दिल्याबद्दल सोसायटीचा गौरव..!

महाळुंगे विकास सेवा सहकारी संस्थेने १००% वसुल दिल्याबद्दल सोसायटीचा गौरव..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : महाळुंगे इंगळे गावातील महाळुंगे विकास सेवा सहकारी संस्थेने मागील तीन आर्थिक वर्षात १००% वसुल दिल्या बद्दल संस्थेचा पुणे जिल्हा बँकेच्यावतीने प्रशस्तीपत्रक व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी साल २०२१-२२, साल २०२२-२३ व साल २०२३-२४ सालात बँक पातळीवर शंभर टक्के वसुल केल्याबद्दल प्रत्येक सालातील चेअरमन यांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस देऊन बँकेचे संचालक माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी २०२१-२२ सालामध्ये महाळुंगे सोसायटीचे तत्कालीन चेअरमन तानाजी तात्याबा पवार, २०२२-२३ सालामध्ये महाळुंगे सोसायटीचे तत्कालीन चेअरमन शिवाजी सहादू महाळुंगकर तर २०२३-२४ मध्ये महाळुंगे सोसायटीच्या चेअरमन सुमन काशिनाथ गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सोसायटीच्या विद्यमान संचालक तथा खेड बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत इंगवले, विद्यमान चेअरमन सुमन गायकवाड, माजी चेअरमन तानाजी पवार, शिवाजी महाळुकर, रवींद्र गाढवे, संचालक अशोक शिवळे, श्रीहरी सोनावणे, सचिव निलेश देशमुख आदी. मान्यवर उपस्थित होते.