सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन...
![सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65c0e00db0ce8.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - परशुराम निखळे (दौड/रावणगांव)
पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा .लि. यांच्यावतीने 35 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाचे रावणगाव येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले.
यावेळी पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे प्रा. लि. चे ऑपरेशन मॅनेजर रवीकुमार मारवाडी, प्लाझा मॅनेजर अनिल सिननूर, लीगल ऑफिसर एडवोकेट योगेश सरोदे, प्लाझा मॅनेजर सतीश चव्हाण, टोल ऑडिटर प्रवीण कांबळे, अनुज कुमार यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी यांना महामार्ग सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. भारत देशामध्ये दरवर्षी होणारे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी होण्याचे होण्याचे प्रमाण व आकडेवारी तसेच कारणे याबाबत विस्तृतपणे सांगितले. तसेच होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील आपत्कालीन क्रमांक 1033, एमर्जेंसी कॉल बॉक्स, टू व्हीलर चालवत असताना शोल्डर लेनचा करावयाचा वापर, हेल्मेटचा वापर तसेच चार चाकी वाहन चालवीत असताना सीट बेल्टचा करावयाचा वापर, वेगाची मर्यादा महामार्गावरील विविध प्रकारच्या साईन बोर्ड चा वापर वाहन चालवत असताना कसा करायचा याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष नारायण नाना आटोळे, सोनबा साहेब आटोळे, गावड़े सर, धुमाळ साहेब, प्राचार्य विजय कुमार आटोळे तसेच शिक्षक स्टाफ राऺधवण सर, आटोळे मॅडम सवॅ शिक्षक स्टाप रामदास आटोळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमा वेळी पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा लि यांचे कडून महामार्ग सुरक्षा बाबत ची महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर द्वारे दाखवण्यात आले. तसेच महामार्ग सुरक्षेबाबत या विषयावर चित्रकलेचे आयोजन करण्यात आले व विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित विद्यार्थ्यांना विचारण्यात आले व त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.