ईतवारी - रिवा व गोंडवाना एक्स्प्रेस गाड्यांच्या थांबा संदर्भात; खासदारांना निवेदन...
![ईतवारी - रिवा व गोंडवाना एक्स्प्रेस गाड्यांच्या थांबा संदर्भात; खासदारांना निवेदन...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_643407e810e63.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : तिरोडा
स्थानीय श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समिती तर्फे; तिरोडा येथे ०१७५४ रिवा - ईतवारी एक्स्प्रेस ०१७५३ ईतवारी - रिवा एक्स्प्रेस तसेच १२४१० हजरत निजामुद्दीन - रायगढ १२४०९ रायगढ- हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस या दोन गाड्यांचा थांबा.! तिरोडा येथे उपलब्ध करून देण्यात यावा ह्या मागणीचे निवेदन गोंदिया / भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांना देण्यात आले. खासदारांचा समीती सदस्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन, त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला व निवेदन सादर केले.
तिरोडा येथे पर्यटन व व्यापार संदर्भात अनेक वाव आहे. अदानी पाॅवर प्लॅंट तसेच नागझिरा अभयारण्य जवळ असल्याने, बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांची व नागरीकांना सोयीचे होईल. दिल्ली करीता जाण्यासाठी केवळ एकच गाडीचा थांबा येथे उपलब्ध आहे. समयानूसार येथे ईतर गाड्यांचा थांबा देने आवश्यक आहे. ह्या मागणी संदर्भात समीतीने शहरातील गणमान्य नागरीक व संस्थांकडून सह्यांचे पत्र तसेच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचे समीतीच्या मागणीला दूजोरा देणारे पत्र सुद्धा खासदारांना सादर करण्यात आले. खासदारांनी योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन समीतीला दिले आहे. या प्रसंगी समीतीचे संदीप खणंग, विशाल रावत, सागर खणंग व ईतर उपस्थित होते.