"माझी माती माझा देश" अभियानांतर्गत "अमृत कलश यात्रा" संपन्न...
!["माझी माती माझा देश" अभियानांतर्गत "अमृत कलश यात्रा" संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_6520075301570.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बालाजी कांबळे, परभणी
माझी माती माझा देश" या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर “अमृत कलश यात्रा" चे आयोजन देशभरात करण्यात आले होते. ज्यामध्ये परभणी जिल्ह्याने आपला सहभाग घेत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, परभणी महानगरपालिका यांनी ही आपला सहभाग घेत आपआपल्या गावागावात, तसेच शहरातील परिसरातील वॉर्डात फिरून माती संकलित करून कलशा मध्ये जमा केली होती.
सर्व विभागा कडून जमा केलेले 11 कलश मुबंई ला पाठविण्यात येणार आहे. आणि त्या नंतर हे कलश विशेष ट्रेन ने दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. आज ही कलश यात्रा परभणी जिल्हाधिकारी कार्यालया पासून राजगोपालचारी उद्यान पर्यंत काढण्यात आली.
या रॅली मध्ये परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.