पालखेड बंधारा येथे प्रजासत्ताक दिन उत्सात साजरा...
![पालखेड बंधारा येथे प्रजासत्ताक दिन उत्सात साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63d3ad97698fe.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमता जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून, यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घोषणाबाजी केली. या फेरीची सांगता ग्रामपंचायतीच्या प्रांगणात करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच रेखा गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीचे ध्वजारोहण सचिव झिरवळ यांच्या हस्ते करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक बोराडे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अण्णा वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन शिक्षिका भारती भामरे यांनी करून शपथ देण्यात आली. कोराटे येथेही जनता विद्यालयात मुख्याध्यापिका एस.बी. ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पूर्व भागातील भागांमध्ये अनेक शाळा विद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.