साकोळ, होनमाळ, शिरूर अनंतपाळ रस्ता बनला मृत्यूचा मार्ग...

साकोळ, होनमाळ, शिरूर अनंतपाळ रस्ता बनला मृत्यूचा मार्ग...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, शिरुर अनंतपाळ

शिरूर आनंतपाळ तालुक्याला जोडण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून साकोळ, होनमाळ, शिरूर अनंतपाळ हा जिल्हा परिषद अंतर्गत डांबरीयुक्त रस्ता करण्यात आला असून, हाच रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग बनला आहे. मागील तीन-चार वर्षांपूर्वी राणी अंकुलगा,घुग्गी सांगवी,साकोळ,होनमाळ व पुढे शिरूर अनंतपाळ तालुक्याला जोडणारा डांबरीयुक्त रस्ता बनविण्यात होता. परंतु हाच रस्ता या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. 

साकोळ पासून तीन किलोमीटर अंतरावर कोटकसर ओढा असून या ओढ्यावरती पाईप टाकून पूल बनवण्या ऐवजी सिमेंटचा रस्ता बनवण्यात आला. या ओढ्याला पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारचे पाणी वाहत असून नदीसारखे स्वरूप येत. तर सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी फार मोठे शेवाळ तयार झालेले असून याच ठिकाणी वाहतूक करणाऱ्या गावातील गावाबाहेरील प्रवाशांना सिमेंट युक्त रस्त्यावरून जाताना खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हा रस्ता पार करत असताना मागील तीन-चार वर्षांमध्ये हजारोच्या संख्येने छोटे-मोठे अपघात होऊन काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या दुर्घटनामुळे जिल्हा परिषद विभागाने आतातरी पाईप टाकून पूल बनवण्याची मागणी शेतकरी व प्रवासी वर्गातून होत आहे.