गेल्या तीस वर्षानंतर आले शालेय मित्र एकत्र.! यशवंतराव विद्यालयांमध्ये रंगला मेळावा...

गेल्या तीस वर्षानंतर आले शालेय मित्र एकत्र.! यशवंतराव विद्यालयांमध्ये रंगला मेळावा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

कळवण तालुक्यातील निवाने येथील यशवंतराव विद्यालयांमध्ये १९९५ मधील दहावीतील शालेय मित्र प्रदीर्घ काळानंतर तीस वर्षानंतर आज दि.२६ रोजी पहिल्यांदाच एकत्र येऊन मित्र मेळावा देण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. बी.सोनवणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.डी.आहेर बच्छाव जी.के. सोनवणे पी.टी.गुंजाळ डी.एस.पवार एन.के.सोनवणे श्रीमती संगीता आहेर क्रीडा प्रशिक्षक दादा गांगुर्डे आधी उपस्थित होते. या मेळाव्याला अनेक ठिकाणाहून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. बऱ्याच वर्षानंतर सर्व मित्र प्रथमच भेटत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

प्रथमतः गुरु जणांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर या सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन परिचय करून देत मनोगत व्यक्त करून तीस वर्षाचा जीवन प्रवास सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.दुपारी या सर्व विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम केला. यावेळी जवळपास ५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.