शिवसेना महीला आघाडी'च्या बीड तालुका प्रमुखपदी सौ. सुरेखा माने यांची नियुक्ती...

शिवसेना महीला आघाडी'च्या बीड तालुका प्रमुखपदी सौ. सुरेखा माने यांची नियुक्ती...

NEWS15 प्रतिनिधी – बीड

बीड जिल्ह्यात शिवसेना (शिंदे) पक्षाला चांगलाच प्रतिसाद मिळत असून, अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश करत आहेत. तर पक्षातील आधीच्या पदाधीकाऱ्यांना देखील शिवसेना पार्टी नवीन जबादरी देत आहे. नुकतेच काही प्रमुख पदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, शिवसेना महीला आघाडी'च्या बीड तालुका प्रमुखपदी सौ. सुरेखा बापूसाहेब माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. सुरेखा बापूसाहेब माने यांची शिवसेना महीला आघाडी'च्या बीड तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाचे नेते किरण पावसकर, शिवसेना पक्ष विदर्भाचे नेते किरण पांडव, शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या हस्ते; व शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक बापू खांडे पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश बाप्पा उगले, कार्यक्षेत्र गेवराई विधानसभा शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर नाना तळेकर, कार्यक्षेत्र बीड विधानसभा यांच्या उपस्थितीत शिवसेना महिला आघाडी बीड तालुका प्रमुख पदी नियुक्तीचे पत्र सौ. सुरेखा माने यांना देण्यात आले आहे.