राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तौसिफ मणियार यांची निवड...

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तौसिफ मणियार यांची निवड...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी दिनांक १ रोजी शेतकरी आक्रोश  मोर्चा प्रसंगी आले होते. यावेळी वरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तौसीब मणियार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वमान्य कुटुंबातील एका छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली. तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तोसिफ मनियार हे नेहमीच अग्रेसर असतात. कादवा सहकारी कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वात दहा वर्षापासून ते संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात पक्षाने राबविलेल्या अभिप्राय अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक महाराष्ट्रात प्रथम अन्याचं काम तौसिफ मनियार यांनी केले आहे. त्यामुळे मनियार यांना शरद पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराही देण्यात आला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी काम करत असताना पक्षश्रेष्ठींनी तसेच अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब ज्येष्ठ नेते  दत्तात्रय पाटील,कोंडाजी आव्हाड, यांनी माझ्यावरती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली त्याबद्दल यांचे आभार मानून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते शरद पवार यांच्या विचारानुसार मागील काळात ज्या पद्धतीने आपण नाशिक जिल्ह्यात संघटनेचे काम उभे केले त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजाच्या माध्यमातून काम उभे करून जिल्ह्यातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ तरुण आजी माजी पदाधिकारी यांना सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे मनियार यांनी सांगितले. 

 त्याप्रसंगी श्रीराम शेटे दत्तात्रेय पाटील कोंडाजी आव्हाड गजानन शेलार अनिल देशमुख बाळासाहेब जाधव भास्कर भगरे शाम हिरे पुरुषोत्तम कडलक गोकुळ पिंगळे नरेश देशमुख राजू ढगे राहुल ऊगले रोशन ढगे छबुराव मटाले जयवंत जाधव संतोष रहेरे संदीप भेरे सागर गुंबाडे तुषार वाघ बाळासाहेब पाटील दिलीप शिंदे असकरी मिर्झा अनवर सय्यद दिलावर तांबोळी हाजी मुक्तार शेख गालिब मिर्झा हाजी अल्ताफ शेख वसीम पठाण सलीम मिर्झा बब्बु शेख मोसिन शेख सद्दाम अत्तार मंजूर शेख हबीब सय्यद परवेज शेख आरिफ शेख जलील रजवी भैय्या मनियार नदीम मिर्झा अकलाक शेख आयाज शेख शेहबाज पठाण मोहम्मद सैय्यद आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.