12 तारखेला उद्धव ठाकरे यांची तोफ यवतमाळ जिल्ह्यात धडकणार...

12 तारखेला उद्धव ठाकरे यांची तोफ यवतमाळ जिल्ह्यात धडकणार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार

यवतमाळ : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असल्याने; राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि दौऱ्यांचीही सुरुवात झाली आहे.

याच अनुषंगाने मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला असू, या निमित्याने 12 तारखेला उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तसेच राळेगाव येथे जनसंवाद मेळाव्याला संबोधित करतील. पुसद येथील विठाबाई नगर वाशिम रोड येथे मोठा सभा मंडप उभारण्यात आला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याचे संजय देशमुख यांनी सांगितले.