अकोले पेट्रोल पंप कामगारांचे आरोग्य राम भरोसे...
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील अकोले : सध्या सगळीकडे कोरोंना व्हाइरसमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन चालू असल्यांने अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील पेट्रोल पंप सेवा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. परंतु अकोले तालुक्यातील पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांचे आरोग्य एकदम रामभरोसे असल्याचे समोर असले आहे. अत्यावश्यक सेवेत अंबुलन्स, शेतकरी, पोलीस, पत्रकार, सरकारी कर्मचारी यांनाच सध्या पेट्रोल किंवा डिझेल वितरित केले जाते. पण अकोल्यातील पंपांवर काही ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक यांनाही हा पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे कर्मचारी यांना पेट्रोल पंप मालक व पंप मॅनेजर फोन वरून यांना द्या, त्यांना द्या अशा सूचना दिल्या जातात. यावरून मालक आणि चालक बसतात घरी आणि कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्यासाठी करतात प्रामाणिक काम..मग जर या पेट्रोल पंप मालकांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीवापेक्षा पैसे महत्वाचे असतील तर यात कितपत शासनाच्या नियमांचे पालन होते हेही तितकेच महत्त्वाचे ठरेल.