ठाण्यातील संत ज्ञानेश्वर परिसरात; वागळे इस्टेट पोलिसांना आढळला व्यक्तीचा मृतदेह...
![ठाण्यातील संत ज्ञानेश्वर परिसरात; वागळे इस्टेट पोलिसांना आढळला व्यक्तीचा मृतदेह...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_6338061fd30f9.jpg)
प्रतिनिधी - स्विटी जगताप
ठाणे : ठाण्यातील संत ज्ञानेश्वर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, वागळे इस्टेट पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांना प्रगती हॉस्पिटल समोर शुक्रवार (दि.9 सप्टेंबर 2022) रोजी दुपारी 12 वा. हा मृतदेह आढळून आला आहे.
कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक जोंधळे यांनी या संपूर्ण प्रकाराची दखल घेतली असून, मृत व्यक्तीची तपासनी केली असता; पुरुषाचे कोणतेही ओळखपत्र हाती न लागल्याचे तसेच कोणीही अजून चौकशी करण्यास न आल्याचे पोलिसांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. मृत व्यक्ती ही अद्याप बेवारस असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत व्यक्तीचे वय ३५ ते ४० च्या दरम्यान असून, अंगावर काळ्या सफेद रंगाचा शर्ट आहे तर निळ्या रंगाची जीन्सपॅन्ट असून, सावळा रंग दाढी मिशी असे वर्णन आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वागळे इस्टेट पोलीस उपनिरीक्षक सुरज जोंधळे करत असून, सदर अनोळखी इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास किंवा सदर बेवारस अनोळखी मयत इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास तात्काळ वागळे इस्टेट पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.