आ.डॉ.किरण लहामटे मित्र परिवारांने हाती घेतला 4 कार्याचा वसा, संगमनेर पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांना मोफत भाजीपाल्याचे वितरण..
News15 प्रतिनिधी रवी नेहे पाटील
संगमनेर : महाभयंकर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशाचे संरक्षण करत असणारे कर्तव्यदक्ष पोलीस बांधव तसेच काही हातावर पोट असणारे गरजू व्यक्ती अडचणीत सापडल्याने आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मित्रपरिवाराने या सर्वांना मोफत भाजीपाल्याचे वितरण केले आहे. देशात व राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहे. या सर्वांना आमदार डॉ.लहामटे यांचे विश्वासू प्रभात चौधरी, राकेश वाकचौरे, शुभम वाकचौरे, युवा ऊद्योजक गणेश वाकचौरे या युवकांनी संगमनेर येथील पोलीस वसाहतीतील स्वखर्चातून मोफत भाजीपाल्याचे वाटप केले. या युवकांनी देशावर कोरोनाचे संकट कोसळल्यामुळे हे एक संकट नाहीतर संधी म्हणून 4 कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या युवकांनी लॉकडाऊन चालू झाल्यानंतर प्रथमता कळस या ग्रामीण खेडेगावात तसेच अकोलेतील पोलीस स्टेशनचे कर्मचारी व काही गरीब गरजूंना आठ दिवस पुरेल इतक्या भाजीपाल्याचे वितरण केले होते. त्याचबरोबर स्वच्छतेची दक्षता म्हणून या युवकांनी कळस बु गावात मोफत मास्क व सॅनिटायझरचेही वाटप केले होते. या युवकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व युवक सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. हे युवक या 4 कार्याबरोबरच सर्वच जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच स्वच्छतेचा संदेश देत असतात. युवक करत असलेल्या कौतुकास्पद उपक्रमाचे संगमनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनीही युवकांचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप टाकली. तसेच 4 कार्यात नेहमीच मदत करण्याचे आश्वासनही दिले. या तरुणांना या उपक्रमासाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वर वाकचौरे, शिवसेनेचे नेते रावसाहेब वाकचौरे, दौलत वाकचौरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.