आ.डॉ. किरण लहामटे मित्र परिवाराने सोडविला पोलीस बांधव तसेच अकोले तालुक्यातील गरजूंचा भाजीपाल्याचा प्रश्न..

News15 विशेष प्रतिनिधी अकोले : सर्व अकोले शहरातील लॉकडाऊनमुळे बंद असणारी भाजी मंडई त्याचबरोबर पोलीस बांधवांना असणारी दररोजची ड्युटी व काही परभणी जिल्ह्यातील रोजनदारीसाठी आलेल्या व्यक्ती लॉकडाऊनमुळे अकोले शहरात अडकलेल्या आहेत. हिच गरज लक्षात घेऊन आमदार डॉ.लहामटे यांचे विश्वासू सहकारी प्रभात चौधरी, युवा उद्योजक किशोर वाकचौरे, सागर वाकचौरे, प्रेम गवांदे या युवकांनी अकोले तालुक्यातील सर्व पोलीस बांधव तसेच अगस्ती विद्यालया मधील सर्व गरजूंना मोफत भाजीपाल्याचे वितरण केले. अकोले तालुक्यात लॉकडाऊन अतिशय काटेकोरपणे पाळला जात आहे हे यशस्वी करण्यात पोलीस बांधवांचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच पोलिस बांधवांना स्वतःच्या घराकडे लक्ष देणे खूप कठीण होत आहे. त्यांना या काळात तारेवरची कसरत करावी लागते त्यात कुटुंबाला असणारी दररोजची गरज भागविणे अवघड होऊन बसले आहे. डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य चोख पणे पोलीस बांधव आपली ड्युटी करत आहेत. यासर्व बाबीचा विचार करून आणि आपण समाज्याचे काहीतरी देणे लागतो या उक्ती प्रमाणे युवकांनी या सर्व पोलीस बांधवांना घरपोच भाजीपाल्याचे वितरण केले. त्याच बरोबर अगस्ती विद्यालया समोर काही रोजगारासाठी अकोलेत आलेले गरजू व्यक्तीचेही मोठ्या प्रमाणात हाल होत होते, त्यांच्याकडे आतापर्यंत अक्षरशः कोणीही फिरकुणही बघितले नव्हते. त्यांनाही मोफत भाजीपाल्याचे वितरण करण्यात आले. या युवकांचा उपक्रम बघून त्यांनाही आनंदाश्रू अनावर झाले. या युवकांकडून नेहमीच 4 बांधिलकी जपली जाते. या युवकांनी या आधीही कळसमध्ये मास्क, सँनीटायझर, तसेच मोफत भाजीपाल्याचेही वाटप केले आहे. 4 कार्यात हे युवक नेहमीच अग्रेसर असतात.या युवकांचा हा उपक्रम बघून सर्वच स्तरातून या युवकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी त्यांना आमदार डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वर वाकचौरे, सेनेचे नेते रावसाहेब वाकचौरे, दौलत वाकचौरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले..